महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात ..
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय पुन्हा मातृतीर्थात .. दीसना ✍️ सिंदखेडराजा:- मतदारसंघातील पाणी समस्या निर्मूलनासाठी देऊळगावराजा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ह्या कार्यालयाची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर ते कार्यालय तेथून स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नातून म. जी. प्रा. चे तेच कार्यालय देऊळगावराजा येथे स्थलांतरित करण्यात पुन्हा यश आले आहे. त्यामुळे देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर व चिखली आदि तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बळ प्राप्त झाले आहे. सिंदखेडराजा व देऊळगावराजा ह्या दोन शहरात २५ वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई होती. नव्हेतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही शहरातील तोच मुद्दा खूप गाजला होता. त्यावेळी छत्री ह्या निशाणीवर अपक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे व त्यांच्या समर्थकांनी ह्याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत डॉ. शिंगणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी भाजप व सेना युतीतील श...