पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..!

इमेज
  मतदारांनो निवडणूक आपल्याच हातात घ्या ..! नाहीतर पाच वर्षे पस्तावण्याची वेळ येईल ...!! त्यांना फक्त आणि फक्त निवडून यायचे आहे ....!!! दीसना ✍️ देऊळगावराजा/सिंदखेडराजा  सिंदखेडराजा मतदारसंघात देऊळगावराजा व सिंदखेडराजा ह्या दोन नगरपालिका आहेत. काही वर्षांच्या गॅपनंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. फॉर्म भरणे सुरुही झाले आहे. पहिल्या दिवशीचे चित्र पाहता दोन्हीही ठिकाणी कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. मात्र सोशल मीडियावर उमेदवारांचा महापूर लोटला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा  मॅनिफेस्टो जाहीर न करता बहुसंख्यांना काहीही करुन फक्त निवडून यायचे, एवढेच दृश्य दिसते. त्यामुळे मतदारांनी सावध होत, ही निवडणूक काळजीपूर्वक आपल्या हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर नको ते उमेदवार एकदा का निवडून आले की पस्तावण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी मतभेद विसरून आपल्या परिसरातील सर्वांनी एकत्र या. तेथील समस्या अडीअडचणी यांचा अभ्यास करुन नोंद ठेवा. इच्छुक उमेदवारासमोर त्याची मांडणी करा. जर उमेदवार समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तयार असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्गाने उमेदवाराची हम...