मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत, वयस्कर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न
मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत, प्रौढ इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथे एका प्रौढ व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून तेथे दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना आज सकाळी ११.०० वा. सुमारास घडली आहे. हिवरा आश्रम येथील रमेश रामभाऊ सरकटे हा अंदाजे ५५ वर्षांचा प्रौढ इसम सकाळी ११.०० वा. च्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला, तेथे जाऊन त्याने पोलिसांना पुकारले. कर्तव्यावर हजर असलेल्या बीट जमादार प्रवीण गवई, नितीन राजे जाधव, तुका लक्ष्मण इनामे, निवृत्ती पोकळे आदिंनी घटनास्थळ गाठले. त्याचवेळी ठाणेदार स्वप्नील नाईक यांनीही लगोलग कळविले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर रमेश सरकटे याने एक चिठ्ठी खाली फेकत, पोलिसांना त्यावर कारवाई करण्याचे म्हटले. दरम्यान ठाणेदार स्वप्नील नाईक हे आपल्या आणखी काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. सरकटे याने फेकलेली ती चिठ्ठी खाली येताच पोलिसांनी कारवाई करण्याची हमी दिली. मात्र आता आपले काम झाले म्हणत, रमेश सरकटे याने सोबत असलेली दोरी टॉवरच्या पाईपला बांधून फास तयार केला....