बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे?
बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे? मग बघून घ्या ... अमरावती विभागातील कोणता जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा निकाल व क्रमांक कितवा आहे ....! सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका निहाय निकाल पुढीलप्रमाणे .. निकालामध्ये देऊळगावराजा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार २७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार २६२ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५५७ प्रथम श्रेणीत, ४११ द्वितीय श्रेणीत, ८६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९६.८३ एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिखली तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार १५० विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ८१६ प्रथम श्रेणीत, १ हजार १२० द्वितीय श्रेणीत, १६६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३ हजार ९९४ विद्यार्थी उत्...