पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत - राजू केंद्रे

इमेज
  शैक्षणिक क्षेत्रात वंचितांच्या मदतीसाठी सदैव तत्पर - डॉ. शिंगणे वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत - राजू केंद्रे सिंदखेडराजा:- राजू केंद्रे यांनी स्वतःचे तसेच गावचे नाव सातासमुद्रापार करीत फोर्ब्स मासिकाने त्याची दखल घेतली आहे. मात्र जागतिक पातळीवर पोहोचूनही त्याची ग्रामीण व वंचितांसाठीची कळकळ रुपी नाळ अजूनही शाबूत आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या प्रयत्नासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्र यातील आंतरसबंधात सविस्तर विश्लेषण केले. पिंप्री खंदारे येथे काल दि. १ ऑक्टोबर, शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत व एकलव्य फाउंडेशन तर्फे आयोजित आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. शिंगणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कमलबाई मदन चौधर तर माजी जि. प. सभापती अभय चव्हाण, विठ्ठल चव्हाण, एकनाथ बुरकुल, बबनअप्पा हाजबे, भाऊराव पवार, प्रल्हाद ढाकणे आदि प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी लंडन येथून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या राजू केंद्रे, साहित्यिक विशाल इंगोले, पीएचडी स्कॉलर अनंता खरात...