हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील निवडणूक
हाडे, पंचाळ व अग्रवाल ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी बिनविरोध राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा येथील निवडणूक सिंदखेडराजा:- तालुक्यातील राताळी, गोरेगाव व साखरखेर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज दि. २० मार्च, रविवारी रोजी बिनविरोध झालेल्या ह्या निवडणुकीत राताळी ग्रामसेवा सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मदन सखाराम हाडे व उपाध्यक्षपदी लक्ष्मण शामराव सोभागे यांची बिनविरोध निवड झाली. याचवेळी गोरेगाव ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी भगवान सखाराम पंचाळ तर उपाध्यक्षपदी परमेश्वर शामराव खिल्लारे यांची निवड झाली. तसेच साखरखेर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ललीतकुमार जुगलकिशोर अग्रवाल तर उपाध्यक्षपदी बेबीबाई जीवनसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील देवरे, उदय सुरडकर यांच्यासह रवींद्र शेजुळ विकास अधिकारी साखरखेर्डा, गटसचिव संजय पंचाळ व झोपे अण्णा यांनी काम पाहिले . सर्व प्रक्रिया बिनविरोध होताच नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आल...