पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र

इमेज
 कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र       अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ                         वृत्तविश्लेषण                 ✍️दीसना✍️ सिंदखेडराजा:- अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १ डिसेंबर, मंगळवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी विविध माध्यमातून संपर्क साधणारे उमेदवार तसेच त्यांचे समर्थक आदि सर्वांनाच मतदार शिक्षक तेवढ्याच आत्मीयतेने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका कोण उमेदवार यशस्वी होईल? ह्याची शास्वती सध्या तरी नाही. मात्र मतदार शिक्षकांच्या चर्चेतून राजकीय पक्षांनी दिलेले (लादलेले) उमेदवार सोडून अपक्ष उमेदवारातच प्रमुख लढत रंगणार असल्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पडघमावर वर्षभरापूर्वी पासूनच टिपरी पडली आहे. तेंव्हापासून इच्छुक उमेदवार तयारील...

माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार

इमेज
माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार   सिंदखेडराजा:- उतरत्या वयातही मन तसेच शरीर खंबीर ठेवले. योग्य प्रकारचा वैद्यकीय सल्ला, उपचार घेतले. त्याला अनुसरुन वैयक्तिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. यातून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार तोताराम कायंदे कोरोना विषाणूला नामोहरम करीत कोविड १९ रोगातून मुक्त होत येत्या दोन दिवसांत घरी परतणार असल्याची खात्रीशीर माहिती कायंदे कुटुंबियांकडून प्राप्त झाली आहे. तोताराम कायंदे यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यात सातत्य ठेवणासाठी वेळोवेळी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळोवेळी भेटी देण्यात कायंदे मतदारसंघात मोजक्या राजकारण्यांपैकी एक आहेत. वयाच्या पंचाहत्तरीत टवटवीत राहून अथक परिश्रम घेत संपर्कात राहण्याचे त्यांचे कार्य नवयुवकाला लाजविण्याजोगे आहे. गेल्या मार्च पासून कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असतांना, इतर काही राजकारणी फक्त मोबाईल व सोशल मीडियावर संपर्क ठेवत असतांना, कायंदे यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धा...