भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल
भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल सिंदखेडराजा:- भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एका बहिणीने आपल्या भावाला यकृतदान करीत समाजात एक स्पृहणीय आदर्श निर्माण केला आहे. दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा दिवस भावाबहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस असतो. त्यानिमित्ताने भावाच्या घरी म्हणजेच माहेरी हक्काधिकाराने जाता येत असते. भाचे मंडळी सुद्धा मामाच्या घरी जाण्यासाठी आतुर असतात. त्यामुळेच दिवाळीचा सण आला की सासुरवाशीण महिला माहेराकडे डोळे लावून आठवण काढत असतात. तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सौ. दुर्गा अरुण धायतडक हिचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा हे आहे. तिचा भाऊ हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात निदान व उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. परंतु त्यामध्ये यकृत बिघाड जास्तच असल्याचे आढळले. त्यामुळे औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आ...